व्यास अंबरीष वसिष्ठ नारद
व्यास अंबरीष वसिष्ठ नारद ।
शौनक प्रल्हाद भागवत ॥१॥
नित्य स्मरण करी यांचें जरी प्राणी ।
पुन्हां नाहीं खाणी चौंर्याशींची ॥२॥
शुक पराशर मुनि पुंडलीक ।
अर्जुन वाल्मीक नाम गाती ॥३॥
बली बिभीषण भीष्म रुक्मांगद ।
बकदाल्भ्य शुद्ध महाऋषि ॥४॥
तुका म्हणे यांचीं नामें येतां वाणीं ।
प्रत्यक्ष तो प्राणी देवाऐसा ॥५॥