अयोध्या मथुरा काशी अवंतिका
अयोध्या मथुरा काशी अवंतिका ।
कांची हे द्वारका माया सत्य ॥१॥
मोक्ष पुर्या ऐशा नित्य वाचे स्मरे ।
प्राणी तो उद्धरे स्मरणमात्रें ॥२॥
नित्य नित्य मनीं हरि आठवावा ।
तेणेंचि तरावा भवसिंधु ॥३॥
तुका म्हणे ऐसा नामाचा महिमा ।
राहील जो नेमा तोचि धन्य ॥४॥