स्तुती करूं तरी कोण माझी मती
स्तुती करूं तरी कोण माझी मती ।
वेदां पडे भ्रांति हें आश्चर्य ॥१॥
परी हा जिव्हाग्रीं रामकृष्णहरी ।
बैसवीं लौकरी यातीगुण ॥२॥
रूप गुण कीर्ति कृपाळू उदार ।
वर्णावया पार ब्रह्मा नेणे ॥३॥
रूपीं नामीं शिव होऊनिया वेडा ।
वर्णिला पवाडा रामनामीं ॥४॥
तुका म्हणे मज नेणवेचि शिव ।
नाहीं राहिला वाव बोलावया ॥५॥