शब्दाचिया भावें केला उपचार
शब्दाचिया भावें केला उपचार ।
तेणें सर्वेश्वर संतोषला ॥१॥
शब्दाचिया करें करविलें भोजन ।
धाला नारायण तेणें सुखें ॥२॥
शब्दाचिया करें करविले आचमन ।
तांबूल अर्पून फळें पुष्पें ॥३॥
तुका म्हणे अन्नाआधी धूपदीप ।
उपचार अल्प समर्पिले ॥४॥