हरिपाठ→संत श्री तुकाराम महाराजपरिमळमिश्रित करूनि उटणें♡ Favoriteपरिमळमिश्रित करूनि उटणें । नारायण तेणें तोषविला ॥१॥ पय घृत दहि मधु ते शर्करा । गोशृंगधारा अखंडित ॥२॥ करोनि संयुक्त ओपियली ईशा । पंचामृतें तैशी पंचविधि ॥३॥ तुका म्हणे जेथें गंगे जन्म झाला । प्रसाद दिधला आम्हालागी ॥४॥आणखी भक्ती साहित्यहरिपाठ पहा→