नेणें जप तप योग युक्ति ध्यान
नेणें जप तप योग युक्ति ध्यान ।
करितां चिंतन रात्रंदिवस ॥१॥
नेणें कांहीं देवा झालों उतराई ।
मागें लागों पाहीं बाळ जैसा ॥२॥
भाव-गंगोदकें आम्ही शुद्ध पाहें ।
प्रक्षाळिले पाय विटेसहित ॥३॥
जन्मली जान्हवी ज्या ठायीं उत्तम ।
हारावया श्रम भाविकांचे ॥४॥
तुका म्हणे आम्ही झालों पुण्यवंत ।
सेविलें अमृत रामतीर्थ ॥५॥