नमो विश्वरूपा अगा मायबाप
नमो विश्वरूपा अगा मायबाप ।
अपारा अमूपा पांडुरंगा ॥१॥
विनवितो रंक दास मी सेवक ।
वचन तें एक आइकावे ॥२॥
तुझी स्तुती वेद करितां भागला ।
निवांतचि ठेला नेति नेति ॥३॥
ऋशि मुनि बहु सिद्ध कविजन ।
वर्णितां तुझे गुण न सरती ॥४॥
तुका म्हणे तेथें काय माझी वाणी ।
जे तुझी वाखाणी कीर्ति देवा ॥५॥