हरिपाठ→संत श्री तुकाराम महाराजमन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा♡ Favoriteमन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा । पुनरपि संसारा येणें नाहीं ॥१॥ मन हें सेवंती अर्पुनी भगवंती । पुनरपि संसृती येणें नाहीं ॥२॥ मन हें तुळसी अर्पुनी हृषीकशी । पुनरपि जन्मासी येणें नाहीं ॥३॥ तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा । तया वास व्हावा वैकुंठासी ॥४॥आणखी भक्ती साहित्यहरिपाठ पहा→