हरिपाठ→संत श्री तुकाराम महाराजकाय तुज कैसें जाणावें गा देवा♡ Favoriteकाय तुज कैसें जाणावें गा देवा । आणावे अनुभवा कैशापरी ॥१॥ सगुण निर्गुण स्थूल कीं लहान । न कळे अनुमान मज तुझें ॥२॥ कोणता निर्धार करूं हा विचार । भवसिंधु पार तारावया ॥३॥ तुका म्हणे कैसें पाय आतुडती । न पडे श्रीपती वर्म ठावें ॥४॥आणखी भक्ती साहित्यहरिपाठ पहा→