विठ्ठला गुंतलोया संसारी ।
नाही आठवण तुझी श्रीहरी ।।१।।
बालपण गेले सुखवांत, तारुण्य आले धोक्यात ।
म्हातारपण आले दारात ।।२।।
आला मानव या संसारी ।
आपण आपण झाला वैरी ।।३।।
गर्भ वासी बहु बैसलो ।
चौऱ्यांशी योनी फिरुनी आलो ।।४।।
तुका म्हणे जगावेगळे ।
लटिक प्रपंच सारे ।।५।।