विठ्ठल आवडी प्रेमभावो
विठ्ठल नामाचा रे टाहो ।।धृ।।
विठ्ठल आवडी प्रेमभावो ।
विठ्ठल नामाचा रे टाहो ।।१।।
तुटला हा संदेहो ।
भवमूळ व्याधीचा ।।२।।
म्हणा नरहरी उच्चार ।
कृष्ण हरी श्रीधर ।
हेची नाम आम्हा सार ।
संसार करावया प्रेमभावो ।।३।।
नैणो नामाविण काही ।
विठ्ठल कृष्ण लवलाही ।
नामा म्हणे तरलो पाही ।
विठ्ठल विठ्ठल म्हणताची ।।३।।