वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान कशी ठुमकत निघाली गवळण
वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान
कशी ठुमकत निघाली गवळण ।। धृ ।।
माठ दुधाच डोईवरी ।
पदर उडतो वाऱ्यावरी ॥
पायी पैंजण वाजती रुणझुण ।।१।।
नंदाचा ग श्रीहरी ।
नको दूरावा ये जवळी ॥
पायी पैंजण वाजती रुणझुण ।।२।।
एका जनार्दनी भेटीसाठी ।
धावत आले यमुनेकाठी ॥
पायी पैंजण वाजती रुणझुण ।।३।।