हरिपाठ→श्री संत ज्ञानेश्वर महाराजत्रिवेणीसंगमीं♡ Favoriteत्रिवेणीसंगमीं नाना तीर्थ भ्रमि । चित्त नाहीं नामीं तरी ते व्यर्थ ॥१॥ नामासी विमुख तो नर पापिया । हरीविण धांवया न पवे कोणी ॥२॥ पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक । नामें तिन्ही लोक उद्धरती ॥३॥ ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥४॥आणखी भक्ती साहित्यहरिपाठ पहा→