अभंग→विठ्ठलसुंदर ते ध्यान उभे विटेवरी♡ Favoriteसुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवोनिया ॥धृ॥ तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेचि ध्यान ॥१॥ मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित ॥२॥ तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने ॥३॥🎵ऐकाही भक्ती रचना ऐका🎵ऐकाही भक्ती रचना ऐकाआणखी भक्ती साहित्यअभंग पहा→