रडू नको बाळा मी पाण्याला जाते,
पाण्याला जाते बाळ,
पाण्याला जाते बाळा ॥धृ॥
खारे खोबरे तुला खायला देते,
खायला देते बाळा खायला देते ॥१॥
आगरे टोपरे तुला घालायला देते,
उचलून तुला कडेवर घेते ॥२॥
सोन्याचा चेंडू तुला खेळायला देते,
खेळायला देते तुला खेळायला देते ॥३॥
एका जनार्दनी पूर्ण कृपेने,
पूर्ण कृपेने बाळा पूर्ण कृपेने ॥४॥