राधा राधा करी बासरी
कृष्ण येता झाली बावरी
भेट तुझी रे युगा युगाची
साथ दे तू मज जन्माची
मिलनाची आशा अंतरी
कृष्ण येता झाली बावरी
घागर घेउनी पानियाशी जाता
आड रस्त्यावरी कान्हा उभा होता
किती करशील रे मस्करी
कृष्ण येता झाली बावरी ...
एका जनार्धनी पूर्ण कृपेने
सद्गुरू श्री मी शरण मी आले
किती करशील रे मस्करी
कृष्ण येता झाली बावरी ...