शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला
पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपतीरायाला
ऐसा-ऐसा हा गणपती, त्याची माता पार्वती
चौदा विद्यांचा विद्यापती, त्याचे गुण मी गाऊ किती
आहे ब्रह्मांडाचे ज्ञान, माझ्या बाप्पा मोरयाला
पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपतीरायाला
देतो भक्तांना वरदान, हा वर्धविनायक
सिद्धी देतो कार्याला, हा सिद्धिविनायक
गौरीगणांचा गुणगान इथे आलो मी गायाला
पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपतीरायाला