नमो गजानन नमो हनुमान
दोघांमध्ये आहे कोण बलवान ।।धृ।।
गजानन म्हणे मी रिद्धी-सिद्धी धारी
हनुमान म्हणे मी बलवान ब्रह्मचारी ।।१।।
गजानन म्हणे माझ्या नैवेद्याला लाडू
हनुमान म्हणे मला तेलाचा गडडू ।।२।।
गजानन म्हणे मी शिवगड पाहिला
हनुमान म्हणे मी लंकागड जाळीला ।।३।।
रामदास म्हणे मी कोणाला मानू
देव आहे एकच जाणू ।।४।।