नको मारू रे कान्हा पिचकारी
साडी रंगान भिजल माझी साडी
कान्हा पडते रे पाया दही दूध देते रे खाया
कातू रागावला माझा वरी
गोकुलात जेव्हा तुझी माझी जोडी
नित्य वाटेत कान्हा करतोय खोडी
कान्हा पडते रे पाया दही दूध देते रे खाया
गवळणी मधे मी गवळन छोटी
तुझी वागणूक भलतीच खोटी
कान्हा पडते रे पाया दही दूध देते रे खाया
चुगली सांगते माझा घरी
गोकुलात तुझी माझी झाली निंदा
सम्ध्यानी मला पहिलेच तिनदा
कान्हा पडते रे पाया दही दूध देते रे खाया
नवरा मारू देई पलंगावरी
नको मारू रे कान्हा पिचकारी