अभंग→विठ्ठलमाझे माहेर पंढरी♡ Favoriteमाझे माहेर पंढरी। आहे भीवरेच्या तीरी॥ बाप आणि आई। माझी विठ्ठल रखुमाई॥ १ ॥ पुंडलिक राहे बंधू। त्याची ख्याती काय सांगू॥ २ ॥ माझी बहिण चंद्रभागा। करितसे पाप भंगा॥ ३ ॥ एका जनार्दनी शरण। करी माहेरची आठवण॥ ४ ॥आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→