लागला जीवाला छंद विठ्ठलाचा,
भजनात यावा यावा वास चंदनाचा ॥ धृ ॥
धन्य चंद्रभागा धन्य पुंडलिक,
परिमळाची वृद्धी त्या पंढरीला ॥१॥
आषाढी कार्तिकी एकादशीला,
वैष्णवांचा मेळा जमतो तुझ्या पंढरीला ॥२॥
तुका म्हणे माझा सखा पांडुरंग,
नाचत नाचत यावे तुझ्या पंढरीला ॥३॥