अभंग→विठ्ठलकृपाळू हा पंढरीनाथ♡ Favoriteकृपाळू हा पंढरीनाथ वडिलांचे दैवत । माझ्या वडिलांचे दैवत । माझ्या वडिलांचे दैवत ।।धृ।। पंढरीसी जावू चला भेटू रखुमाई विठ्ठला ।।१।। पुंडलिके बरवे केले कैसे भक्तीने गोविले ।।२।। एका जनार्दनी नीट पायी जडलीसे विट ।।३।।आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→