कोणी पाहिला का राजा राम राम राम
जय श्रीराम जय हनुमान ॥ धृ ॥
राम लक्ष्मण सीतामाई
वनवासी आले कैकयी पायी
कोणी पाहिला का राजा राम राम राम ॥१॥
भरत शत्रुघ्न जटायू पाहून
जटायू पाहून सांगती खून
कोणी पाहिला का राजा राम राम राम ॥२॥
नळ निळ जांबुवंत
पुढे उभा हनुमंत
कोणी पाहिलं का राजा राम राम राम ॥३॥