अभंग→विठ्ठलज्या सुखा कारणे देव वेडावला♡ Favoriteज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला॥ धन्य धन्य संताचे सदन तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण॥ १ ॥ सर्व सुखाची सुखराशी, संत चरणी भुक्ती मुक्ती दासी॥ २ ॥ एका जनार्दनी पार नाही सुखा म्हणोनी देव भुलले देखा देखा॥ ३ ॥आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→