अभंग→विठ्ठलघेई घेई माझे वाचे♡ Favoriteघेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥१॥ तुम्ही घ्या रे डोळे सुख । पहा विठोबाचे मुख ॥२॥ तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥३॥ मना तेथे धाव घेई । राहे विठोबाचे पायी ॥४॥ तुका म्हणे जीवा । नको सोडू या केशवा ॥५॥आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→