घातली रांगोळी गुलालाची,
स्वारी आली गणरायाची ॥धृ॥
दुर्वा पुष्प बहुप्रिय माळा,
हार रत्नांचा शोभला ॥१॥
नैवेद्य मोदकांचा केला,
प्रसाद वाटून काला केला ॥२॥
दास म्हणे श्रीगणराया,
मस्तक ठेवितो तुमच्या पाया ॥३॥
गणराया गजानना,
म्हणा गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया ॥धृ॥
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता,
विघ्नविनाशक मोरया ॥१॥
सर्व सुखाचा तू प्रभुदाता,
सिद्धिविनायक मोरया ॥२॥
अज्ञान बालक करितो सेवा,
दर्शन द्या तुम्ही दर्शन द्या ॥३॥