तुला डोक्यावर घेईन, प्रेमे नाचवीत आणेन
देवा गजानना तुझला छान मखरात बसवेन... ।।धृ।।
सरला आषाढ श्रावण, आला भाद्रपद मास
तुझ्या दर्शनाची देवा ओढ लागे या जीवास
एका वर्षाने येऊन गेला होतात सांगून... ।।१।।
होता तुझं हे आगमन झालं घराचं मंदिर
तुझं करण्या पूजन मन झाले हे अधीर
दुर्वांफूल हे अर्पून मनोभावे मी पूजीन... ।।२।।
सुख समृद्धी दे भक्तां, हेच मागणं एकदंता
तूच सकालांचा दाता, टाकी मिठूनी चिंता
गुणगान तुझं गाता मन गेले हे आनंदुनी... ।।३।।