ज्ञानोबा माऊली तुकाराम
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम
देव इंद्रायणी थांबला ।।धृ।।
पंढरीचा पांडुरंग अळंदीशी आला
भक्ती भावाने एक रूप झाला ।।१।।
म्हणे मुक्ताबाई चमत्कार झाला
समाधी घेता हात थरथरला ।।२।।
एका जनार्दनी इंद्रायणी आठव
उधळुनी निघाले अळंदीचे गाव ।।३।।