चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विठ्ठरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी तो पहा विठ्ठरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी ।।धृ।।
कधी प्रगटला तो जगजेठी आला पुंडलिकाच्या भेटी
पाहून सेवा घर, थांबला हरी तो पहा विठ्ठरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी ।।१।।
नाम देव नामात रंगला, संत तुका कीर्तनी दंगला
टाळ घेऊनी तरी, चला वारकरी, तो पहा विठ्ठरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी ।।२।।
संत जनाई ओवी गाई, विठाई ग विठाई
माझी पंढरीची आई, कशी सखू अन बहिणाबाई
विठाई ग विठाई, माझी पंढरीची आई,
रखुमाई मंदिरी ऐकली पुरी तो पहा विठ्ठरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी ।।३।।