ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर,
समोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले ॥धृ॥
माय उभी ही गाय होऊनी,
पुढे वासरू पाहे वळुनी
कृतार्थतेचे ध्यान विचारे,
पायावर झुकले ॥१॥
चरण शुभंकर करिता तुमचे,
मंदिर बनले उभ्या घराचे
धुमटामधुनी हृदय पाखरू,
स्वानंदे फिरले ॥२॥
तुम्हीच केली सारी कीमया,
कृतार्थ झाली माझी काया
तुमच्या हाती माझ्या भक्ती,
अवदुंबर बसले ॥३॥