आम्ही विठ्ठल तुम्ही विठ्ठल ॥धृ॥
सागराच्या संगे नदी विघडली,
नदी विघडुनी सागरमय झाली ॥१॥
चंदनाच्या संगे बोरी विघडल्या,
बोरी विघडल्या चंदनमय झाल्या ॥२॥
परिसाच्या संगे लोहा विघडला,
लोहा विघडला सुवर्णमय झाला ॥३॥
विठ्ठलाच्या संगे तुका विघडला,
तुका विघडला वैकुंठाशी गेला ॥४॥