आधी रचिली पंढरी,
मग वैकुंठ नगरी ॥१॥
जेव्हा नव्हते चराचर,
तेव्हा होते पंढरपूर
चंद्रभागेच्या तटी,
धन्य पंढरी गोमटी ॥२॥
जेव्हा नव्हत्या गोड गंगा,
तेव्हा होती चंद्रभागा
चंद्रभागेच्या तटी,
धन्य पंढरी गोमटी ॥३॥
नामा म्हणे बा श्रीहरी,
ते म्या देखिली पंढरी
चंद्रभागेच्या तटी,
धन्य पंढरी गोमटी ॥४॥