आधी रचिली ही पंढरी,
मग वैकुंठ नगरी ॥धृ॥
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
जेव्हा नव्हते चराचर
तेव्हा होते पंढरपूर
चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमटी ॥१॥
जेव्हा नव्हत्या गोडा गंगा,
तेव्हा होती चंद्रभागा ॥२॥
नासिलिया भूमंडळ,
उरे पंढरी मंडळ ॥३॥
नामा म्हणे बा श्रीहरी,
ती म्या देखिली पंढरी
चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमटी ॥४॥