आमची माळीयाचा जात,
शेत लावू बागाईत ॥धृ॥
आम्हा हाती मोट नाडा,
पाणी आले फुल्हाडा ॥१॥
शांती शेवंती फुलली,
प्रेमे जाई जुई व्याली ॥२॥
सावत्याने केला मळा,
विठ्ठल देखवियेला डोळा ॥३॥
हरी आला रे आला रे,
हरी आला रे हरी आला
संत संग ब्रह्मानंद झाला रे ॥धृ॥
हरी येथे रे हरी तेथे रे,
हरी वाचून नाही रिते रे ॥१॥
हरी आला आधिरे हरी भंती रे,
हरी व्यापर सर्व भुती रे ॥२॥
हरी जाणा रे हरी वाणा रे,
बाप रखुमादेवीवरू राणा रे ॥३॥